दहावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची बातमी; निकालाबाबतचे मूल्यमापन कसे होणार जाणून घ्या...
पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द झाली मात्र निकाल कशापद्धतीने जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली. असे होणार निकालाबाबतचे मूल्यमापन, यामध्ये नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व दहावीचे अंतिम तोंडी/प्रात्याक्षिक/ अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात येणार आहे.
त्यानुसार इयत्ता नववीतील 100 पैकी 50 गुण तर दहावीतील 80 पैकी 30 गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. निकाल कधी जाहीर होणार? : दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशी चर्चा सध्या सुरु आहे. त्यानुसार, आता शिक्षण मंडळाकडून मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना आणि वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. 10 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता शिक्षक आणि मुख्याध्यापकांना या कार्यपद्धतीच्या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. तसेच शासन निर्णयानुसार 10वीच्या मूल्यमापन कार्यपद्धतीच्या संदर्भात प्रशिक्षणाचा व्हिडीओ शिक्षण मंडळाच्या यू-ट्यूब चॅनलवर http://mh-ssc.ac.in/faq या लिंकवर 10 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
कार्यवाहीचे वेळापत्रक
मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत मंडळाच्या यू-ट्यूब चॅनलवर प्रशिक्षण - 10 जून 2021 (सकाळी 11 ते दुपारी 1)
अपवादात्मक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे - 11 जून 2021 ते 20 जून 2021
विषय शिक्षकांनी विषयनिहाय गुणतक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करणे - 11 जून 2021 ते 20 जून 2021
वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून निकाल शाळेच्या निकाल समितीकडे सादर करणे - 11 जून 2021 ते 20 जून 2021
वर्ग शिक्षकांनी तयार केलेल्या निकालाचे निकाल समितीने परीक्षण व नियमन करून प्रमाणित करणे - 12 जून 2021 ते 24 जून 2021
मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीत भरणे - 21 जून 2021 ते 30 जून 2021
मुख्याध्यापकांनी निकाल समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल व अनुषंगिक स्वाक्षरी प्रपत्रे सिलबंद पाकीटात विभागीय मंडळात जमा करणे. (विभागीय मंडळाच्या नियोजनानुसार) - 25 जून 2021 ते 30 जून 2021
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) परीक्षा निकालाबाबत विभागीय मंडळ व राज्यमंडळ स्तरावरील प्रक्रिया - 3 जुलै 2021 पासून.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज लातूर
#Mahalive Mahalive News
Comments