परशुराम जयंती उत्सव समितीकडून परिचारिकांच्या कल्याणार्थ एक लाखाचा निधी...
- MahaLive News
- Jun 10, 2021
- 1 min read

लातूर- परिचारिकांनी कोरोना संसर्गाच्या संकटकालीन परिस्थितीत बजावलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेत लातूरच्या परशुराम जयंती उत्सव समितीने परिचारिकांच्या कल्याणार्थ एक लाखाचा निधी सुपूर्द केला आहे. यावेळी जयंती समितीचे सदस्य यशवंत आंदूरकर यांनी वैयक्तिक रु.५००० निधी संघटनेस भेट म्हणून दिला. परशुराम जयंती उत्सव समिती दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबवते.

या जयंती उत्सव समितीने यावर्षी लातूरच्या स्व.विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान व संशोधन संस्था येथील परिचारिकांच्या कल्याणार्थ १ लाखाचा निधीसह कृतज्ञता सन्मानपत्र महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. गत वर्षभर समाजातील विविध घटकांकडून परिचारिकांनी केलेल्या सेवेबद्दल शाब्दिक कौतुक केले. यावेळी श्री परशुराम जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संजय पांडे, यावर्षीचे जयंती समिती अध्यक्ष डॉ.रविराज पोरे, संजय निलेगावकर, जगदिश कुलकर्णी, डॉ.नितीन सास्तुरकर, ईश्वर कुलकर्णी, प्रसाद उदगीरकर, पापाशेठ ताथोडे, सुधाकर जोशी तसेच महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे अधिकारी व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज लातूर
#Mahalive Mahalive News
Comentários