Search
मराठवाड्यात कोरोनाचे ३१२ नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू...
- MahaLive News
- Aug 10, 2021
- 1 min read

औरंगाबाद- मराठवाड्यात सोमवारी (ता. ९) दिवसभरात कोरोनाचे ३१२ रुग्ण आढळले. जिल्हानिहाय आढळलेली रुग्णसंख्या अशी; बीड १६७, उस्मानाबाद ९४, लातूर-जालना प्रत्येकी १४, औरंगाबाद १३, नांदेड ९, हिंगोली १, परभणी ०. दरम्यान, बीडमध्ये तीन, लातूर-औरंगाबादेत प्रत्येकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ६२३ झाली आहे. आणखी २१ रुग्ण बरे झाले. त्यात ग्रामीण भागातील १६ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत एक लाख ४३ हजार ८६७ रुग्ण बरे झाले आहेत. २४३ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वैजापूर तालुक्यातील महिलेचा (वय ६०) घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. आतापर्यंत तीन हजार ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज औरंगाबाद
Mahalive News
Hozzászólások