सिल्लोडमध्ये भरधाव स्कॉर्पिओ चार पलट्या घेत उलटली; एक ठार, दोन जण जखमी...
- MahaLive News
- Aug 10, 2021
- 1 min read

औरंगाबाद- सिल्लोड शहरात मंगळवारी (ता.दहा) पहाटे दोन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये वाहनाने तीन, चार पलट्या घेत रस्त्याच्या कडेला ते फेकले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्लोड शहरालगत असलेल्या भराडी फाटा येथून शहरात स्काॅर्पिओ (एमएच २० सीएस ४४२१) भरधाव वेगाने येत असताना वाहनाने तीन ते चार पलट्या घेतल्याने ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यामध्ये विशाल डिगंबर महाकाळ (वय २६, रा.जयभवानीनगर, सिल्लोड) हा जागीच ठार झाला. तर रोहित सुखदेव गवते (वय २५), अनिकेत राजू गायकवाड (वय २३, दोघे रा.सिल्लोड) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, कर्मचारी पंडित फुले, टी.बी.टारपे यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज औरंगाबाद
Mahalive News
Comentarios