लातूर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन पुढील आदेशापर्यंत नाही; सर्व आठवडी बाजार सुरू राहणार...
- MahaLive News
- Jun 11, 2021
- 1 min read

लातूर- ब्रेक डी चैन अंतर्गत दिनांक 6 जून 2021 रोजी जिल्हा प्रशासनाने अनलॉकचे जे आदेश दिलेले आहेत तेच आदेश शनिवार-रविवार या दिवशी ही लागू राहणार आहेत. विकेंड मध्ये ही सर्व दुकाने नियमितपणे सुरु राहणार आहेत.

तसेच जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार ही त्या त्या दिवशी सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पुढील काळात प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत वीकेंड लॉकडाऊन नसेल. तसेच covid-19 च्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे तंतोतंत पालन करून कोरोना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज लातूर
#Mahalive Mahalive News Latur
Comments