कोल्हापूरहून साताऱ्यात लग्नासाठी आलेल्या दोन तरूणांचा अपघातात मृत्यू; एकजण गंभीर जखमी...
- MahaLive News
- Aug 11, 2021
- 1 min read

सातारा- सातारा येथे कोल्हापूरहून लग्नासाठी आलेल्या दोन तरूणांचा चारचाकी कारचा अपघात होवून मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कारवरील चालकाचा ताबा सुटून 30 फूट खोल ओढ्यात कार गेलेली होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा येथे बुधवारी होणाऱ्या लग्नासाठी कोल्हापुरातून तीन तरूण चारचाकी गाडीतून क्रमांक (एम एच- 09 एफ बी- 5670) मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास सातारकडे गेले होते. तेथून युवकांनी कास पठारावर जावून जेवण करून परतत असताना रात्री एकच्या सुमारास पोवई नाका- कोरेगाव मार्गावरील न्यायालय इमारती अलीकडे गाडीचा अपघात झाला. यावेळी चालकांचा ताबा सुटून गाडी ३० फूट ओढ्यामध्ये कार गेल्याने अपघात तिघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना सातारा डायग्नोस्टिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. अपघातातील जखमीचा उपचारा दरम्यान अनिकेत राजेंद्र कुलकर्णी (वय- 23, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) व आदित्य प्रताप घाडगे (वय- 23, रा. कसबा बावडा) हे दोघे मयत झाले आहेत. तर देवराज अण्णाप्पा माळी (वय- 21, रा. कसबा बावडा) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर साताऱ्यात उपचार सुरू आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज सातारा
Mahalive News
Kommentare