पुणे लोकलबाबत मोठा निर्णय; दोन डोस घेतलेल्या नागरिकांना पुणे लोकल सुरु होणार...
- MahaLive News
- Aug 11, 2021
- 1 min read

पुणे- दोन डोस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाला मुबा देण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईनंतर पुणे लोकलसाठीही तेच नियम ग्राह्य धरणार आहेत. पुणे-लोणावळा लोकल आणि पुणे दौंड डेमू प्रवासासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आता परवानगी मिळणार आहे. प्रवाशांना आवश्यक असलेला फोटो पास पोलिस प्रशासनांकडून देण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे. मुंबई प्रमाणेच पुण्यातही लोकल प्रवासाची मागणी होत होती. मुंबईत दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची मुभा देण्यात आल्यानंतर पुण्यातही या मागणीनं जोर पकडला. त्यांनंतर आता मुंबईच्या धरतीवर पुणे लोकलला प्रवाससाठी मुभा देण्यात येण्याची शक्यता आहे. दोन डोस पूर्ण घेतले असतील अन् 14 पूर्ण झाले असतील तर लोकलने प्रवास करता येणार आहे. लवकरच याबाबतची कार्यवाही सुरू होईल. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करता येतोय. पण मागील काही दिवसांपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर धरत होती. मुंबईनंतर पुण्यातही दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करता येणार आहे. पुणे - लोणावळा लोकलच्या दिवसातून चार फेऱ्या होत आहे. तर पुणे - दौंड दरम्यान देखील दिवसातून चार फेऱ्या होत आहे. सध्या लोकल फेऱ्या वाढविण्याबाबत रेल्वेने कोणताही विचार केला नाही. मात्र, दोन डोस घेतलेल्या नागरिकांना परवानगी दिल्यानंतर प्रवाशांची संख्या पाहून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज पुणे
Mahalive News
Comments