नाशिक ऑक्सिजन गळतीमुळे 24 जणांचा हकनाक बळी घेणाऱ्या कंपनीला लाखांचा दंड..
- MahaLive News
- Aug 11, 2021
- 2 min read

नाशिक- नाशिक महानगरपालिकेच्य डॉ. झाकिर हुसैन रूग्णालयात 21 एप्रिल 2021 टँकमध्ये ऑक्सिजन भरताना झालेल्या गळतीमुळे तब्बल 24 रुग्णांना हकनाक आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतर आता या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ऑक्सिजन भरताना हलगर्जी करणाऱ्या कंपनी आणि ठेकेदारावर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. 24 जणांचा हकनाक बळी घेणाऱ्या या कंपनीवर प्रशासनाने अवघ्या काही लाख रुपयांची कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन टॅंक बसवणारी निप्पोन कंपनी व ड्युरा सिलेंडर पुरवणारे ठेकेदार जाधव ट्रेडर्स यांना लाखो रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. हलगर्जीपणामुळे निप्पोन कंपनीला 22 लाख तर बॅकअप ऑक्सिजन सिलेंडर पुरावणाऱ्या ठेकेदार जाधव ट्रेडर्सला 2 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात झालेली जीवितहानी पाहता ही कारवाई फारशी कठोर नसल्याचं नाशिककरांचं म्हणणं आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. ज्यानंतर आता कंपनी आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, असं असलं तरी रुग्णालया प्रशासनावर अद्याप तरी कोणताही कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला नाही. नाशिकच्या डॉ. झाकिर हुसैन रूगणालयात 21 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजनची गळती झाली होती. ज्यामुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने जे रुग्ण हे ऑक्सिजन सपोर्टवर होते त्यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला होता. त्यामुळे अवघ्या काही क्षणात तब्बल 24 जणांनी आपले प्राण गमावले होते. दरम्यान, रूग्णालयात टँकची गळती झाल्यानंतर ती रोखण्यासाठी अर्धा तासाहून अधिक वेळ लागला होता ज्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. जेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा रूग्णालयात एकूण 150 पेक्षा जास्त रूग्ण हे ऑक्सिजनवर होते तर 15 रूग्ण व्हेंटिलेटरवर होते. यापैकी आता 24 रूग्णांचा मृत्यू झालेला होता. या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा किती कुचकामी आहे याचं हे मोठं उदाहरण होतं. नाशिकमधील अनेक शासकीय रुग्णालयात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे येथील रुग्णांचा जीव नेहमीच टांगणीला लागलेला असल्याची प्रतिक्रिया नाशिककर व्यक्त करतात.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज नाशिक
Mahalive News
Comentarios