लाईट चालू कर असे म्हणत सभापतीच्या मुलाची महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण...
- MahaLive News
- Aug 13, 2022
- 1 min read

पूर्णा- फार्म हाउसची लाईट चालू कर असे म्हणून महावितरण कंपनीच्या कर्मचा-यास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महावितरण कर्मचा-यांने दिलेल्या तक्रारीवरून चुडावा पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कृषि उत्त्पन्न बाजार समिती सभापतीच्या मुलासह अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात खळबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील मौजे चुडावा येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्र कार्यालयावर कर्तव्य बजावत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञानिक चंद्रप्रकाश धर्मपाल इंगोले (राÞप्रभात नगर नांदेड) यांना दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी २: ३० वाजताच्या सुमारास सभापती बालाजी देसाई यांचे चिरंजीव गोविंद देसाई, स्वप्नील देसाई (दोघे रा. चुडावा) यांनी आमच्या फार्म हाऊसची बंद झालेली लाईट का चालू करत नाही म्हणत मारहाण केली व जाती वाचक शिवीगाळ केली.
Comments