भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील सहावा दिवस, कोल्हापुरी थाटात राहुल गांधींचं स्वागत...
कोल्हापुर- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे कोल्हापुरी थाटात स्वागत करण्यात आले आहे. ही यात्रा कळमनुरीमध्ये पोहोचली आहे. येथे कोल्हापुरातून आलेल्या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासह 10 हजार नागरिक कार्यकर्त्यांनी या यात्रेचे कोल्हापुरी थाटात स्वागत केले. लाल फेटे, हलगी, कुस्त्यांनी सलामी दिली. यात्रेचा महाराष्ट्रातील सहावा दिवस आहे. राज्यातील पाच जिल्ह्यातून भारत जोडो यात्रेचा प्रवास होनार आहे. यातील नांदेड जिल्ह्यातील यात्रेचा प्रवास पूर्ण झाला आहे. आता ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात पोहोचली आहे. राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवसात या यात्रेचा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या आहेत. राज्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. #bharatjodoyatra
Comments