top of page

लातूरकरांच्या स्वप्नातील रेल्वे रुळावर कधी येणार; रखडलेल्या रेल्वे मार्गाला अद्याप मंजुरी नाही...


लातूर- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर राेड - अहमदपूर - लाेहा - नांदेड रेल्वे मार्ग मंजुरीच्या कात्रीत अडकला आहे. बाेधन - उदगीर, उस्मानाबद - बीड आणि साेलापूर - बीड - जळगाव हा रेल्वेमार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत रखडला आहे. ताे केव्हा मंजूर हाेणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे मार्गाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. सतत मराठवाड्यातील नागरिकांकडून, प्रवाशांकडून यासाठी पाठपुरावा केला जात आहे. बाेधन - उदगीर, उस्मानाबद - बीड आणि साेलापूर - बीड - जळगाव हा रेल्वेमार्ग मंजुरीच्या प्रतीक्षेत रखडला आहे. ताे केव्हा मंजूर हाेणार? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.


याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना मराठवाडा जनता विकास परिषद लातूर महानगर शाखेच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे मंगळवारी साकडे घातले आहे. यावेळी मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड. भारत साबदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्यामार्फत हे निवेदन देण्यात आले. यामध्ये लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे, ॲड. व्यंकट बेद्रे, प्रा. सुधीर अनवले, महेंद्र जाेशी, शामसुंदर मानधना, ईश्वरचंद्र बाहेती, किशाेर जैन, प्रकाश घादगिने, शेख उस्मान, प्रा. भालचंद्र येडवे, प्रा. याेगेश शर्मा, राजकुमार हाेळीकर यांचा समावेश हाेता.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page