उदगीर येथे काँग्रेसच्या वतीने इंधनदरवाढीवर केंद्र सरकारच्या विरोधात सायकल रॅली आंदोलन...
- MahaLive News
- Jul 12, 2021
- 1 min read

लातूर- दिवसेंदिवस गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होत आहे यामुळे सामान्य माणसाचे जगण कठीण झाले आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात येऊन केंद्र सरकार विरोधात संताप व्यक्त केला आहे. उदगीर शहरातील युवक काँग्रेस, तालुका काँग्रेस यांच्या वतीने आज शहरातील कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी चौकातून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली इंधनदर वाढीमुळे किराणा साहित्य, बांधकाम साहित्य, भाजीपाला व अन्य दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या दरात वाढ झाली. आहे महागाईने उच्चाक गाठला आहे हातावर पोट असलेल्या मजूर, कामगार, छोटे व्यापारी हमाल मापाडी याचं जगणं कठीण झाले आहे यावर केंद्र सरकारने दिलासा देण्याची गरज असताना इंधनदराबाबत काहीच कार्यवाही करत नसल्याने आर्थिक संकटात सामान्य माणूस अडकत आहे केंद्र सरकारने तात्काळ यावर उपाय योजना करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News
Comments