नाशिक ट्रक - बस अपघात; अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर...
नाशिक- साईभक्तांच्या खासगी बसला आज पहाटे नाशिक शिर्डी महामार्गावर सिन्नर-शिर्डी दरम्यान मोठा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे.
अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिलेत. सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
Comments