top of page

लातूरमध्ये 60 वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड घालून खून; खिशात पैसेच नसल्याने आला राग...


लातूर- शहरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून, भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह भागविणाऱ्या वृद्धाचा खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी गांधी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या घटनेने लातूर शहरात खळबळ उडाली आहे. लातूर शहरातील गांधी मार्केट परिसरात झोपेत असलेल्या एका 60 वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास समोर आली आहे. याबाबत गांधी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह करायचा. लातुरात बसस्थानक परिसरातील गांधी मार्केट कॉम्प्लेक्समध्ये रात्रीच्या वेळी झोपायचा. शनिवारी देखील रात्रीच्या वेळी गांधी मार्केट कॉम्प्लेक्समध्ये झोपला होता. यावेळी एक 23 वर्षीय तरुण पोहचला. या तरुणाने वृद्धाकडे पैसे असावे म्हणून खिसे तपासले. बसस्थानक परिसरातील गांधी मार्केट कॉम्प्लेक्समध्ये झोपलेल्या वृद्धाच्या खिशात पैसेच नसल्याने तरुण चिडला आणि रागाच्या भरात त्याने वृद्धाच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला.


दरम्यान याबाबतची माहिती मिळताच गांधी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डी. वाय. एस. पी सुनील गोसावी यांनी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी संशयित अविनाश धनाजी चव्हाण वय 23 वर्षे याला अटक केली आहे.

Комментарии


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page