Search
पालखी सोहळा; पालखी मार्गावरील मटण, दारू दुकाने बंदच्या सूचना...

सातारा- श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून 18 ते 23 जून दरम्यान जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पालखी मार्गावरील मटण, बिअर बार, मद्य विक्रेते यांना दुकाने बंद ठेवण्याबाबत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या आहेत. तसेच मार्गावर दर दोन किलोमीटर अंतरावर वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे आदेशही यावेळी दिले आहेत.
@महाLive News
Comments