मविआचा महामोर्चा; सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपचं माफी मांगो आंदोलन...
मुंबई- आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. रिचर्ड्स अँड क्रूडास मिल पासून सकाळी 10.30 वाजता मोर्च्याला सुरूवात होईल. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. आज सकाळी 10.30 वाजता मोर्चाची सुरुवात झाली. तर इकडं भाजप सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात माफी मांगो आंदोलन करणार आहे.
आज भाजप नेते अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर आंदोलन करणार आहेत. तर अमित साटम, आगरकर चौक, अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला आंदोलन करणार आहेत. मनोज कोटक, राम कदम, निलयोग मॉल, जवाहर रोड, घाटकोपर पूर्व येथे आंदोलन करणार आहेत.
हिंदुत्ववादी संघटनांकडून आज ठाणे बंदची हाक देण्यात आलीय. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय. या बंदला भाजप आणि शिंदे गटाने पाठिंबा दिलाय. ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीतही आज बंदची हाक देण्यात आलीय.
हिंदुत्ववादी संघटनांकडून आज ठाणे बंदची हाक देण्यात आलीय. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय. या बंदला भाजप आणि शिंदे गटाने पाठिंबा दिलाय. ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीतही आज बंदची हाक देण्यात आला.
Comments