महाराष्ट्रात लसीकरनाच विक्रम; एकूण ५ कोटी लसीकरण; एकाच दिवशी ९ लाखांहून अधिक नागरिकांना लस...
- MahaLive News
- Aug 17, 2021
- 1 min read

मुंबई- देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने विक्रमी कामगिरी केली आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच आतपार्यंत महाराष्ट्रात ५ कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक मोहिमेत आज सायंकाळी सहापर्यंत ६ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली आहे. १४ ऑगस्ट रोजी राज्यात एकाच दिवशी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री उशिरापर्यंत त्यात वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अजून एक विक्रम नोंदविला. दिवसभरात शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरणाची आतापर्यंतची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे शस्त्र असून लसींचा पुरवठा सुरळीत राहिल्यास राज्यात अशाच मोठ्या संख्येने नागरिकांचे लसीकरण होऊ शकते. दिवसाला किमान १० लाख लसीकरणाची क्षमता राज्याची असून आज झालेल्या विक्रमी लसीकरणाने हे सिद्ध झाले आहे. यापुढेही असेच विक्रमी संख्येने लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील असेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Mahalive News
Comentaris