विलासराव देशमुख साहेब स्मृती सोहळा संपन्न, विलासराव देशमुख साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण...
- MahaLive News
- Feb 18, 2024
- 1 min read

लातूर- पश्चीम महाराष्ट्रा प्रमाणे मराठवाड्यातही साखर कारखानदारी यशस्वी ठरते नव्हे तर ती राज्य आणि देशासाठीही आदर्श बनू शकते हे सिध्द करून या मागास विभागात आर्थिक क्रांती घडविणारे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांचा त्यांच्याच प्रेरणेतून सुरू झालेल्या विलास साखर कारखान्यावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे अनावरण आणि विलास भवन या कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीची शिलान्यास १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.१० वाजता झाले.

लातूर जिल्हयात सहकार आणि साखर उदयोगाची उभारणी करणारे महान नेते, शेतकऱ्यांचे कैवारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कारखान्याच्या ‘विलासभवन’ या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी क्षण होता. हा कार्यक्रम आपल्यासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांचे विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी ता. जि. लातूर येथे उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळाचे अनावरण आणि ‘विलासभवन’ कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास करण्यासाठी श्री. विलासराव देशमुख साहेब स्मृति सोहळा रवीवार दि. १८ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.१० वा. आयोजित करण्यात आला आहे.
श्री विलासराव देशमुख साहेब स्मृती सोहळा कार्यक्रमाच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख निमंत्रक असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री, मा. श्री. दिलीपराव देशमुख आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मा.आ.श्री. नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कारखान्याच्या ‘विलासभवन’ या प्रशासकीय इमारतीचा शिलान्यास कार्यक्रम संपन्न झाला.
Comments