वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला धक्का; आणखी एका आमदाराचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र...
- MahaLive News
- Jun 18, 2023
- 1 min read

शिवसेना पक्षाचा उद्या वर्धापनदिन आहे. वर्धापन दिनापूर्वी आज शिवसेना ठाकरे गटाचे वरळीत मोठं शिबिर पार पडणार आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आहे. ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यापासून ते आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा सुरू आहे. सत्तासंघर्षानंतर पक्षांमध्ये इन आऊट सुरु आहे. अशात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मनिषा कायंदे यांचा फोन नॉटरिचेबल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदेंसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ३ माजी नगरसेवकदेखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
ठाकरेंच्या महाशिबिराच्या दिवशी एक आमदार शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आगामी महापालिकेंच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे. येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आतापर्यंत अनेक नगरसेवक, पदाधिका-यांनी ठाकरेंची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेंकडे विधानसभा आणि विधानपरिषद मिळून मोजकेच आमदार ठाकरेंकडे आहेत. ठाकरेंकडे असणारे आमदार हळूहळू शिवसेनेत पक्षप्रवेश करू लागल्यानं ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
#वर्धापनदिन #ठाकरे_गट #शिवसेना #मनिषा_कायंदे #शिंदे_गट #महाशिबिर #आमदार #पक्षप्रवेश #निवडणुक #नगरसेवक #पदाधिका #विधानसभा #विधानपरिषद #हळूहळू #चिंता #वर्धापनदिन, #ठाकरे_गट, #शिवसेना, #मनिषा_कायंदे, #शिंदे_गट, #महाशिबिर, #आमदार, #पक्षप्रवेश, #निवडणुक, #नगरसेवक, #पदाधिका, #विधानसभा, #विधानपरिषद, #हळूहळू, #चिंता #Mahalive
Comments