top of page

गणेशोत्सव-दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळणार; वाचा शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय...


महालाईव्ह न्यूज । मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने राज्यातील कॅसिनो कायदा रद्द करण्याचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. तसेच गोरगरीबांसाठीही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव, दिवाळीला गोरगरीबांना अवघ्या 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे लाखो गोरगरीबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळणार आहे. मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्द करण्याचा घेतला आहे. तसेच, गणेशोत्सव, दिवाळीत गोरगरिबांना फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याची घोषणा देखील बैठकीत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात लाखो गोरगरिबांना दिलासा मिळणार आहे. याव्यतिरिक्त आज पार पडलेल्या बैठकीत राज्य सरकारने अनेक इतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.


  1. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यांमध्ये असणारे आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. या योजनेसाठी तब्बल पाच हजार कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

  2. गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा . प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा

  3. आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार

  4. मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आली आहे.

  5. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्यात आला आहे.

  6. केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला.

  7. सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे घेण्यात आला आहे.

  8. दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन देणार

  9. मंडणगड येथे दिवाणी न्यायालय स्थापन करणार


गेल्या 14 एप्रिल रोजी राज्य सरकारने आंबेडकर जयंती दिनी आनंद शिध्याचे वाटप केले होते. त्यावेळी लाखो नागरिकांना याचा फायदा झाला होता. त्यामुळे आता पुन्हा गणेश उत्सवानिमित्त तसेच दिवाळीत देखील हा आनंद शिधा लोकांना वाटण्यात यावा असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे येणारा गणेशत्सव सण गोरगरिब लोक अगदी आनंदात साजरी करू शकणार आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कॅसिनो कायदा रद्द करण्याच्या मागणीने जोर धरला होता. तर, महाराष्ट्रात कॅसिनो सुरू करण्यासाठी मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले होते. हा कायदा तब्बल 1976 पासून अस्तित्वात आहे. मात्र याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात कुठल्याही स्थितीत केसिनो कायदा सुरू करण्यात येऊ नये अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर आज राज्य सरकारने हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page