top of page

दरोडा टाकण्याचे तयारीतील आरोपींना शस्त्रासह अटक; पोलीस ठाणे विवेकानंद चौकची कामगिरी...


लातूर- जिल्ह्यात घडणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पोलीस रात्रगस्त व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करण्याची मोहीम संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच कोंबिंग ऑपरेशन राबवून चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपींना, फरार आरोपींना ताब्यात घेतले जात आहे.


दरम्यान दिनांक 18/03/ 2023 ते 19/03/2023 च्या मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे विवेकानंद चौकची रात्रगस्त सुरू असताना गस्तीवरील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार यांना माहिती मिळाली की, एका अपार्टमेंटच्या बाजूच्या शेतामध्ये, रिंग रोड लगत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने काही सराईत गुन्हेगार एकत्र जमून लपून बसले आहेत. अशी माहिती मिळाली त्यावरून सदर माहितीची खातरजमा करून सदरची माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार यांनी तात्काळ सदरची माहिती वरिष्ठांना कळविली.


त्यावरून पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच चार्ली पेट्रोलिंग वरील पोलीस अंमलदारांना तात्काळ बोलावून घेऊन त्यांचे पथके तयार करून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या गुन्हेगारांच्या ठिकाणाला चोहोबाजीने वेळा घालण्यात आला. व दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना सदर पथकामार्फत अतिशय सीताफिने ताब्यात घेण्यात आले असून अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी पळून गेला असून पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.

त्यांच्याकडे एक लोखंडी बतई, कोयता, चोपर, लोखंडी कत्ती असे घातक साहित्य मिळून आले. त्यांना अधिक विचारपूस केली असता सशस्त्र दरोडा घालण्यासाठी ते अंधाराचा फायदा घेऊन लपून बसले होते असे सांगितले. त्यावरून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 188/2023 कलम 399, 402, भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर हे करीत आहेत.



सदर गुन्ह्यातील आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणेला शरीराविषयक व मालाविषयक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात व विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, उदय सावंत ,पोलीस उपनिरीक्षक हाजी सय्यद ,पोलीस अमलदार संजय कांबळे, मुनवरखा पठाण ,दयानंद सारोळे ,सुधीर साळुंखे, संजय बेरळीकर ,विनोद चलवाड ,नारायण शिंदे, रमेश नामदास, मिलिंद कांबळे तसेच चार्ली मोटार सायकल पेट्रोलिंग वरील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page