top of page

लातूर रेल्वे कारखान्यात होणार 'वंदे भारत' एक्स्प्रेसची निर्मिती; रोजगाराची मोठी संधी...


लातूर- वंदे भारत एक्स्प्रेस आणि वंदे भारत मेट्रोच्या माध्यमातून देशभरात रेल्वेचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. सध्या चेन्नई येथे करण्यात येत असलेली वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. लातूर रेल्वे कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.


लातूर शहरापासून 18 किलोमीटर अंतरावर लातूर कोच फॅक्टरी आहे. 350 एकरवरील क्षेत्र आहे. यापैकी 120 एकरवरील पहिल्यापेक्षा बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. नवी दिल्ली, कानपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, अहमदाबाद आणि लखनौसारख्या मोठ्या रेल्वे स्थानकासह पुरी, जोधपूर, गांधीनगर आणि जयपूरमधील लहान मोठ्या रेल्वेस्थानकांचा कायापलट करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले. २०२३ – २४ चे रेल्वे बजेट बुधवारी जाहीर करण्यात आले. यामध्ये रेल्वेसाठी दोन लाख ४१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


२०१३ ते १४ मध्ये करण्यात आलेल्या रेल्वे तरतुदीच्या तब्बल नऊ पट तरतूद रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. देशभरात २०२३ - २४ मध्ये सहाशे किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग, दीडशे किलोमीटर रेल्वेमार्गाचे रूपांतरण आहे. आणि तब्बल २ हजार ८०० किलोमीटर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. देशभरात वंदे भारत एक्सप्रेसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. वंदेभारत एक्स्प्रेस आणि वंदे भारत मेट्रोच्या माध्यमातून देशभरात रेल्वेचे जाळे निर्माण केले जाणार आहे. देशाचा प्रत्येक कोपरा रेल्वेने जोडण्यात येणार आहे.


यासाठी आता चेन्नईसह महाराष्ट्रातील लातूर, हरियाणा मधील सोनीपत आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती करण्यात येणार आहे. लातूरमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराचीदेखील संधी निर्माण होणार आहे. यामुळे महाराष्ट्रामध्ये रेल्वेचा विकास झपाट्याने होण्याची शक्यता आहे. यासोबतच ते पुढे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी हा कारखाना सुरू झाला असला तरी कोणत्याही मोठ्या प्रकल्पातील रेल्वे गाड्यांची बांधणी अद्यापही होऊ शकलेली नाही.


मात्र आता वंदे भारतची निर्मिती या कारखान्यात सुरू होणार आहे. लातूरसह चेन्नई, सोनीपत, रायबरेली येथे वंदे भारत एक्सप्रेसची निर्मिती जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी रामायण सर्किट, जगन्नाथ सर्किट, काशी विश्वनाथ सर्किट अशा अवघड मार्गांवर देखील भारत गौरव ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या वर्षी बुलेट ट्रेनच्या कामावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page