समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच खुला होणार...
राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा २६ मे रोजी खुला होणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम म्हणजे नागपूर ते शिर्डी पर्यंतचे काम गेल्या वर्षी अर्थातच डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाले. आणि हा 501 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्येच हा महामार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गाचे उर्वरित काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.
तसेच समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर पर्यंतच्या 80 किलोमीटरचे काम देखील पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता हा देखील टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. दरम्यान या चालू महिन्यात हा दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. खरं पाहता शिर्डी ते भरवीर पर्यंतच्या समृद्धी महामार्गाचे काम एप्रिल महिन्यातच पूर्ण झाले आहे मात्र याच्या लोकार्पणाला तारीख लाभत नसल्याचे चित्र आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाची धुरा दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हातात आहे मात्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून या दुसऱ्या टप्प्याला ग्रीन सिग्नल मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान समृद्धी महामार्गाच्या कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळी यांनी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टला दिलेल्या माहितीनुसार या शिर्डी ते भरवीर दरम्यानच्या 80 किलोमीटरच्या मार्गाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण झाले असून याचे लोकार्पण मे महिन्याअखेर अर्थातच या चालू महिन्याअखेर करण्यात केले जाणार आहे. अर्थातच हा टप्पा सुरू झाल्यानंतर आता नागपूर ते भरवीर दरम्यान समृद्धी महामार्गाने प्रवास करता येणे प्रवाशांना शक्य बनणार आहे. नागपूर ते भरवीर पर्यंत चे 600 किलोमीटरचे अंतर असून हा टप्पा सुरू झाल्यानंतर या दरम्यानचा प्रवास गतिमान होण्यास मदत होणार आहे. असा दावा केला जात आहे की नागपूर ते भरवीर पर्यंतचे अंतर आता मात्र सहा तासात कापता येणे शक्य होणार आहे. तसेच शिर्डी ते भरवीर पर्यंतचे अंतर 40 ते 45 मिनिटात कापता येणार आहे.
コメント