Search
दर्शनासाठी निघालेल्या भविकांच्या गाडीचा अपघात; 4 भाविक ठार तर 3 गंभीर...
- MahaLive News
- Jul 23, 2021
- 1 min read

उस्मानाबाद- बालाजीच्या दर्शनासाठी निघालेल्या नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनास उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा जवळ भीषण अपघात झाला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गाडीला मागून एक टेम्पोने धडक दिल्याने 4 भाविक जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी आहेत. मालेगाव तालुक्यातील काही भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने तिरुपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांचे वाहन तेरखेडा गावाजवळ आल्यानंतर टायर फुटल्याने ते बदलण्यासाठी चालकाने वाहन बाजूला घेतले होते. चाक बदलत असतानाच बीडकडून -उस्मानाबादच्या दिशेने भरधाव आलेल्या टेम्पोने पाठीमागून भाविकांच्या वाहनास जोराची धडक दिली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज उस्मानाबाद
Mahalive News
Comments