top of page

मोठी बातमी; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय; यंदाही दहीहंडी नाहीच...


मुंबई- कोरोनामुळे सणउत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या असून, गेल्या दोन वर्षांपासून सर्वच सण साधेपणाने साजरे केले जात आहे. गोकुळाष्टमी निमित्त मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रभर दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पण, कोरोनामुळे सलग दुसऱ्यांदा दहीहंडी कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा पथकं आणि दहिहंडी आयोजक यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाल्यानं दहीहंडी आयोजनास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी काही दिवसांपासून केली जात होती. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध दहीहंडी गोविंदा पथकांकडून आणि दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांकडून ही मागणी केली जात होती. दहीहंडी कार्यक्रमांना परवानगी देण्याची मागणीने जोर धरल्यानंतर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत दहीहंडी आयोजकांसोबत बैठक पार पडली. दूरदृश्य प्रणाली अर्थात व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत दहीहंडी आयोजनास परवानगी नाकारण्यात आली. दहीहंडी आयोजनास परवानगी देण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं. 'टास्क फोर्सने सांगितलं आहे की, दीड महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येईल. ट्रेन सुरू केली कारण राज्याची आर्थिक स्थिती सुधारायची आहे. सोशल डिस्टन्सिंग राखून दहीहंडी करता येणार नाही; मात्र त्या जागेवर पूजा करता येईल. आपापल्या दहीहंडी मंडळाच्या जागेवर पूजा करा, मात्र थर लावता येणार नाही', असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं दहीहंडी समन्वय समितीच्या सचिव गीता झगडे यांनी सांगितलं. 'आपल्या सगळ्यांच्या भावना एकसारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहिजेत; पण, आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचार करण्यालाच प्राधान्य द्यावं लागेल. आम्ही असा निर्णय घेताना अनेकजण आंदोलन करणार असल्याचं जाहीर करतात. मग, आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा ना', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला. "दुसऱ्या लाटेतून आपण डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलो आहोत. आता जी विंडो आपल्याला मिळाली आहे. तिचा वापर आपण थोडं अर्थचक्र सावरण्यासाठी करूया. पुन्हा ती काळरात्र नको; जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ बाजूला ठेवून समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचं पाऊल उचलावं लागेल', अशी समजंस्य भूमिका मुख्यमंत्र्यांनी बैठकीत मांडली.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज मुंबई

Mahalive News


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page