सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी निवासस्थानासाठी 9 कोटी रुपयाचा निधी मंजूर...
- MahaLive News
- Jul 24, 2021
- 1 min read

लातूर- उदगीर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या बांधकामास शासनाने सुमारे 9 कोटीचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा, भूकंप पुनर्वसन, रोजगार हमी व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे. उदगीर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. अधिकारी व कर्मचारी राहात असलेली घरे अत्यंत खराब झाली होती. यामुळे या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत होती. या ठिकाणी नवीन व सर्व सोई सुविधाने युक्त असे निवासस्थान असावे अशी मागणी प्रशासकीय स्तरावरुन करण्यात येत होती. या मागणीला शासनाने हिरवा कंदील दाखविला असुन या घरासाठी शासनाने सुमारे नऊ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने अधिकारी व कर्मचारी याचे 32 निवासस्थान उभे राहणार आहेत. आधुनिक सोई सुविधा सह पर्यावरण पुरक असे हे निवासस्थान असणार आहे. याची प्रशासकीय मान्यता झाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News
تعليقات