Search
अमरावतीत नारायण राणेंच्या वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध; भाजपचे कार्यालय फोडले...
- MahaLive News
- Aug 24, 2021
- 1 min read

अमरावती- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेला वक्तव्याचा अमरावतीत शिवसैनिकांनी निषेध केला. तसेच राजापेठ भागात असलेले भाजपचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले. यामुळे अमरावतीत प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात आज दुपारीच शिवसैनिकांचा एक जत्था राजापेठ परिसरात असलेल्या भाजप कार्यालयावर आला. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यालयावर दगडफेक केली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज अमरावती
Mahalive News
Comments