लातूर जिल्हातील ग्रामरोजगार सेवकांचा बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा...
- MahaLive News
- Aug 24, 2021
- 1 min read

लातूर- जिल्हातील ग्राम रोजगार सेवक यांच्या विविध मागण्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ लातुर शाखेच्या वतीने मा जिल्हाधिकारी लातूर मुख्य कार्यकारी अधिकारी लातूर व यांच्या सह अनेक तालुक्यातून आप आपल्या तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या तात्काळ मान्य नाही झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्राम रोजगार सेवक संघटनेने दिला आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्राम रोजगार सेवकांचे काम हे अत्यंत महत्त्वाचे असून ग्रामरोजगार सेवकांच्या प्रश्नांसंबंधी अनेक वरिष्ठ कार्यालयाकडे वेळोवेळी मागण्या करूनही ग्रामरोजगार सेवकांचे प्रश्न प्रलंबित आहेत.त्यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या ह्या ग्राम रोजगार सेवकांचे प्रलंबित मानधन तात्काळ देण्यात यावे, प्रवास व निर्वाह भत्ता देण्यात यावा प्रलंबित सादिल खर्च देण्यात यावा आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवकासाठी फर्निचर उपलब्ध करावे इत्यादी मागण्या साठी ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने निवेदन दिले असून मागण्या मान्य नाही झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. जिल्हाधिकारी लातूर , मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी औसा यांना निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष चांद शेख , जिल्हा सचिव अमोल घायाळ , औसा तालुका अध्यक्ष भागवत शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल पांचाळ,बालाजी उबाळे,बालाजी पोतदार, दिपक सोनवते या पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News
Kommentare