top of page

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती आज लातूरमध्ये...


लातूर- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती 26 ऑक्टोबर 2023 रोजी लातूर दौऱ्यावर येत आहे. नागरिकांना त्यांच्याकडील कागदोपत्री पुरावे समितीसमोर सादर करावायचे असल्यास, हे पुरावे स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कागदोपत्री पुरावे स्वीकारले जाणार असून त्यानंतर समिती सोमर ठेवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता समितीची बैठक होणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे. हे पुरावे स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे (भ्रमणध्वनी क्र. 8805160570) आणि चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर (भ्रमणध्वनी क्र. 8830724157) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जिल्हा नियोजन भवन येथील कक्षात सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सादर केले जाणारे कागदोपत्री पुरावे दुपारी 2 ते 4 या वेळेत समितीसमोर सादर केले जाणार आहेत. तरी नागरिकांनी त्यांच्याकडील कागदोपत्री पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन सभागृहात 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले आहे.

コメント


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page