समृद्धी महामार्ग शिर्डी ते नाशिक दुसर्या टप्प्याच्या उद्घाटन; पहा थेट...
- MahaLive News
- May 26, 2023
- 1 min read
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी जवळील भरवीर येथे कार्यक्रमस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या दुसरा टप्पा म्हणजे शिर्डी ते नाशिक टप्प्याचे उदघाटन केले. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खासदार, हेमंत गोडसे, किशोर दराडे हे देखील उपस्थित होते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी-भरवीर अखेर आजपासून खुला झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने आता नागपूर ते भरवीर (नाशिक) हे अंतर आता सहा तासांत पूर्ण करता येणार आहे.

शिर्डी येथे आज समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पार पडले. याआधी डिसेंबर 2022 मध्ये नागूपर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. हा पहिला टप्पा 501 किमीचा आहे. आता, शिर्डी ते भरवीर हा 80 किमीचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिर्डी ते भरवीर हे अंतर अवघ्या 40 ते 45 मिनिटात पार करता येणार आहे. शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते भरवीर असा 600 किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.
शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला होण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.
Comments