Search
सुसाट कारचे टायर फुटले; साताऱ्यात भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू, १ जण गंभीर...
- MahaLive News
- Aug 26, 2023
- 1 min read

महालाईव्ह न्यूज - सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी दुर्घटना घडली. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरेंट चौकाजवळ चालू गाडीचा टायर फुटल्याने तवेरा गाडीने पिकप टेम्पोला जोरदार धडक दिली. ज्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताने परिसरात खळबळ उडाली. अपघात इतका भीषण होता की, तरवेरा गाडीचा चक्काचूर झाला.
जखमीवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झालेली तवेरा गाडी नवी मुंबईहून जयसिंगपूरकडे निघाली होती. बॉंम्बे रेस्टॉरंट चौकाजवळ चालू गाडीचा टायर फुटल्याने समोर असणाऱ्या पिकप टेम्पोला जोरदार धडक दिली. ज्यामुळे हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये 2 पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे.
Comments