माळेगावातील सोहळ्याला अजित पवारांना येण्यास विरोध...
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बारामतीच्या माळेगाव येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवारी पार पडणार आहे. पण यासाठी अजित पवारांनी बारामतीत येऊ नये, अशी आक्रमक भुमिका मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली आहे. मोर्चाच्या वतीने कारखान्याचे प्रशासन आणि पोलीसांना याबाबत निवेदन देण्यात आले. याआधी पवारांना माढ्यात गावबंदी करण्यात आली होती.
댓글