Search
नाशिक जिल्ह्यात सप्तश्रुंगी गडावर भाविकांचा अपघात...
- MahaLive News
- Dec 27, 2022
- 1 min read

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तश्रुंगी गडावर जाणाऱ्या भाविकांचा पीकअप पलटी होऊन सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 32 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर नांदुरी येथील रुग्णालयात व वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सप्तश्रुंगी गडावरील दरडोई कर वसुली नाक्यापासून 500 मीटर अंतरावर हा अपघात झाला आहे. घटनास्थळी पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
Comments