भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून महापुरुषांचा अवमान; कोर्टातून आली अखेर मोठी बातमी...
- MahaLive News
- Mar 28, 2023
- 1 min read

मुंबई- राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे. भगतसिंह कोश्यारींचा हेतू कोणत्याही महापुरुषांचा अवमान करण्याचा नव्हता, समाजप्रबोधन करण्याचा होता, अशी टिपण्णी करत छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीसूर्य जोतिबा फुलेंचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. राज्यपालपदी असताना भगतसिंह कोश्यारींनी केलेली वक्तव्य ही इतिहासाचं विश्लेषण करणारी आहेत.
त्यातूनच राज्यपालांचा सामाजिक दृष्टीकोन दिसून येतो. तसेच त्यांचा हा सामाजिक दृष्टीकोन आत्मसात आणि आचरणातही आणावा हा हेतू होता त्यांच्या वक्तव्यांमध्ये होता. त्यामुळे भगतसिंह कोश्यारींनी केलेली वक्तव्य ही कोणत्याही महापुरुषांचा अवमान करणारी असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कायद्यानुसार कारवाईस ते पात्र ठरत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. रमा कटारनवरे यांनी अॅड.अमित कटारनवरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली होती. भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
त्यांच्याबद्दल चुकीचं विधानं केली होती. म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून चौकशीचे आदेश देण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायलयाकडून माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
#mahalivenews #भगतसिंहकोश्यारी #Highcourt
Comments