गर्दी करणाऱ्या व्यक्तींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला चिंतेचा इशारा...
- MahaLive News
- Jun 29, 2021
- 1 min read
Updated: Jul 1, 2021

मुंबई- डेल्टा प्लस या नव्या करोना विषाणुमुळे तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध वाढवले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “आज गरज नसताना असं का केलं जात आहे, असा सहज प्रश्न कुणालाही पडेल, पण तसं नाही. दुसरी लाट बघितली, तर ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा आदींसाठी तारेवरची कसरत करत आपण दुसरी लाट थोपवली. खाली आणली. मात्र, दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही. खाली आहे आणि स्थिरावली आहे. पण, आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे.
तिसरी लाट कधी येईल हे सांगता येत नाही." असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करणाऱ्यांना धोक्याचा इशारा दिला. आता डेल्टा प्लस आढळून आला आहे. डेल्टा प्लसने अजून रंग दाखवलेले नाहीत. गर्दी टाळली गेली नाही, तर दुसरी लाट ओसरण्याऐवजी उलटेन. ही शक्यता गृहित धरली, तर आज जे आपण करतो आहोत, त्याचं महत्त्व नागरिकांच्या लक्षात येईल,” असा इशारा मालाड येथील उपक्रम कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments