हरवलेल्या बहिणींना पुण्यातून शोधून गावी आल्यावर लातुरात एकाच साडीने दोघी बहिणींनी घेतला गळफास...
- MahaLive News
- Jul 3, 2021
- 1 min read

लातूर- घराच्या वरच्या मजल्यावर आडूलन एकाच साडीने दोघा मावस बहिणींनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना लातूर शहरालगत हरंगुळ रोड येथील गोविंद नगर येथे शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या दोघी मावस बहिणींनी का गळफास घेतला, हे कारण मात्र अद्याप समोर आले नाही. पोलिसांनी सांगितले की, लातूर शहरालगत हरंगुळ रोड परिसरात गोविंद नगरात विश्वकर्मा मंदिराच्या लगत एक कुटुंब वास्तव्याला आहे. त्यांचे स्वत:चे घर आहे. शनिवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास गितांजली दत्तात्रय बनसाडे आणि धनश्री संतराम क्षीरसागर या दोघी मावस बहिणी तळमजल्यातून आम्ही वरच्या पहिल्या मजल्यावर कपडे धुण्यासाठी जातो असे म्हणून गेल्या होत्या. काही वेळातच त्यांनी पहिल्या मजल्यावर असलेल्या खोलीच्या आत एकाच साडीने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या गितांजली बनसोडे हीचे वय १७ वर्ष आहे. धनश्री क्षीरसागरचे वय २० वर्ष आहे. दरम्यान, दोघींचेही कुटुंब घरातच होते. धुणे धुण्याच्या कारणाने वरच्या मजल्यावर गेलेल्या असे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजिवन मिरकले यांनी सांगितले. सध्या या आत्महत्येबाबत कोणतेही प्राथमिक कारण हाती आले नाही, असेही सांगण्यात आले. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत. याबबात एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज लातूर
Mahalive News
Comments