top of page
Search
Writer's pictureMahaLive News

आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात ५ जणांचा मृत्यू...


लातूर- उदगीरहून चाकूरला जाणारी एसटी महामंडळाची बस आणि तुळजापूरहून उदगीरकडे येणाऱ्या कारचा उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीच्या पुढे मंगळवारी सकाळी ८.३० वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले असून, बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कारमधील मयत पाच जण उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होते. उदगीरच्या एका हॉस्पिटलमध्ये काम कऱणारे काही जण आणि नर्सिंग कॉलेजचे 2 विद्यार्थी उदगीर शहराकडे निघाले होते. हैबतपूर पाटी जवळ आल्यानंतर पुढून येणाऱ्या एस बसला कारने समोरासमोर जोरदार धडक दिली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या एकाला तातडीने लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अपघातातील मृतांची नावे

  • अलोक खेडकर (वय-21) रा. उदगीर

  • अमोल देवक्तते (वय-24) रा. रावणकोळ ता. मुखेड जि. नांदेड

  • कोमल कोद्रे (वय-22) रा. दोरनाळ ता. मुखेड जि. नांदेड

  • यशोमती देशमुख (वय-28) रा. यवतमाळ

  • नागेश गुंडेवार (वय-27) रा. उदगीर

एसटी बस ही उदगीरहून चाकूरकडे निघालेली होती. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर कारमधील भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी चक्क गाडीता पत्रा कापावा लागला. गॅस कटरच्या साहाय्याने गाडीचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. कार चालकाने नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. पाच तरुणांच्या मृत्यूने उदगीर शहरावर शोककळा पसरली आहे. तसंच मृतांच्या कुटुंबीयांवरही मोठा आघात झालाय. प्रियंका बनसोडे (वय-22) ही तरुणी या अपघातातून बचावली असली, तरी ती जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आपल्या सोबत असलेल्या पाच जणांच्या अपघाती मृत्यीने प्रियंकाला मोठा धक्काच बसलाय.

या अपघातानंतर काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार बाजूला केली. तर एसटीची समोरची काचही तुटली होती. तसंच ड्रायव्हरच्या बाजूच्या चाकालाही फटका बसला होता. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने या मार्गावर झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या अपघातातील सर्व मृतांची ओळख पटली असून पोलिसांनी या अपघातांची नोंद करुन घेतलीय. उदगीर आगाराची बस क्रमांक एमएच २० बीटी १३७५ मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता आगारातून चाकूरकडे रवाना झाली. दरम्यान, बस हैबतपुर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूर येथून दर्शन घेऊन परत उदगीरकडे येणारी कार क्रमांक एमएच २४ एबी ०४०८ बसला समोरुन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील पाचजण जागेवरच ठार झाले. तर बसमधील दहा जण जखमी झाले असून, त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळी उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले.


Comentarios


Weather

Frequently

Select Your Choice

Mahalive Special Report
Play Video
bottom of page