ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सहकारी संस्थांची निवडणूक स्थगित...
- MahaLive News
- Dec 5, 2022
- 1 min read

लातूर- जिल्ह्यातील 'अ' आणि 'ब' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु, राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. डिसेंबरअखेरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमुळे गावागावात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता शासनाने 'अ' आणि 'ब' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. यात लातूर जिल्ह्यातील ५५ सहकारी संस्थांचा समावेश आहे. राज्यात ग्रामपंचायतींसह विविध सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 'अ' आणि 'ब' वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका चांगल्याच गाजतात. त्यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. दोन्ही निवडणुकांमुळे गावागावातील वातावरण तणावाचे होऊ नये, याकरिता शासनाने 'अ' आणि 'ब' स हकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १८ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत राज्यातील ७ हजार ७१५ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, नामनिर्देशन मागवून छाननी होणार आहे. नामनिर्देशन मागे घेणे, मतदानाचा दिनांक, मतमोजणी व निकाल घोषीत करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या सर्व ग्रामपंचायतींची निवडणुकीचा निकाल २० डिसेंबरला जाहीर होणार आहे.
Comments