top of page

मळणीयंत्रात अडकून चालकाचा दुर्देवी मृत्यू; चालकाचे शीर झाले धडा वेगळे...


जालना- तालुक्यातील लिंगेवाडी येथे मळणीयंत्रात अडकून चालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. संदिप सुधाकर गाढे ( 35, बाभूळगाव) असे मृताचे नाव आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की, सध्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. संदिप गाढेकडे मळणीयंत्र असल्याने त्यास शेतातील कामे मिळत. आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान गावालगत असलेल्या लिंगेवाडी येथील सदाशिव साबळे यांच्या शेतात संदीप गेला होता. सोयाबीन काढण्यासाठी मळणी यंत्र सुरु असताना त्यात तांत्रिक अडचण आली. पान्हा घेऊन दुरुस्ती करत असताना तोल गेल्याने संदीप मळणी यंत्रात ओढला गेला. हे पाहताच काहीजणांनी मळणीयंत्र बंद केले. मात्र, तोपर्यंत संदीपचा मृत्यू झाला होता. संदीपचे शीर धडा वेगळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. दरम्यान, माहिती मिळताच सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचारी पाठविले. संदिपचा मळणीयंत्रात अडकलेला मृतदेह काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. संदिपने बाभूळगाव येथे शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय चांगला सुरू असताना चोरट्यानी पूर्ण शेळ्या चोरून नेल्या. यामुळे संदीपने मळणीयंत्र घेतले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page