top of page

आमचं सरकार बाबासाहेबांच्या मार्गावर वाटचाल करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...


भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय. या महामानवामुळे आपण सगळ्या जगात ताठ मानेने उभे आहोत. डॉ. आंबेडकरांच्या घटनेने सगळ्यांना अधिकार दिले, जगण्याचे हक्क दिले. यामुळेच सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर जाऊन देशाची सेवा करू शकला. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातला एक मुख्यमंत्री झाला आणि राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली ते केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे. महापुरुष इतिहास घडवतात, पण बाबासाहेबांनी अपमानकारक जीवन जगणाऱ्यांना दिलासा देऊन इतिहास बदलला. आपल्या ज्ञानाचा वापर त्यांनी दीनदलितांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी जगभरातल्या शोषित, पीडितांच्या हक्कांना, वैचारिक संघटनात्मक बळ दिलं. संघटित होण्याचं बळ त्यांनी दिलं. दलित बांधवांच्यातल्या आत्मविश्वासाचं सगळं श्रेय फक्त बाबासाहेबांनाच. आमच्या सरकारमध्ये इंदू मिलचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही कामाची पाहणी केली तसंच आढावा घेतला आहे. आमचं सरकार बाबासाहेबांच्या मार्गावर वाटचाल करेल, असा निर्धार केला आहे. राजगृह हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे. तो जोपासला जाईल. लोअर परेल इथल्या स्मारकाची पाहणी केली जाईल, बाबासाहेबांच्या आठवणी जपण्याचं काम केलं जाईल", असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दिला आहे.

Comentarios


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page