हिवाळ्यामध्ये अवकाळी पावसाचा जोर कायम; पुढील काही दिवस पावसाचे...
- MahaLive News
- Dec 6, 2023
- 1 min read

मागील दिवसांपासून राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. ह्यामध्ये शेतकऱ्यांचं सर्वात मोठं नुकसान झालं आहे. त्यातच दक्षिण भारतामध्ये आलेल्या चक्री वादळामुळे पाऊस आणखी काहीकाळ तळ ठोकून बसणार आहे. आज चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वातावरण देखील ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
तसेच 5 ते 7 डिसेंबरदरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस हवामान अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान चक्रीवादळ मिचॉन्ग तामिळनाडूला सोडून आंध्र किनारपट्टीवर धडकलं आहे. या चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशामध्ये मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रावरही पडायला सुरुवात झाली आहे.
ความคิดเห็น