मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेल्या पावसाळी अधिवेशनातील घडामोडी; पहा सविस्तर...
- MahaLive News
- Jul 6, 2021
- 1 min read

मुंबई- पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचं समाधान असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते. दोन दिवसाच्या अधिवेशनाच्या कामकाजाविषयी-
▪️ मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याची केंद्राकडे शिफारस करणारा ठराव
▪️ ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळविण्याचा ठराव
▪️ 2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना मोठा दिलासा. तात्पुरत्या नियुक्त्या, वयोमर्यादेत वाढ
▪️ लवकरच महाराष्ट्र आयोगामार्फत १५ हजार ५१५ पदे भरणार तर रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरणार
▪️ केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांत सुधारणा करून नवे विधेयक सादर
▪️ आरोग्य विभागास प्राधान्याने निधी (पुरवणी मागण्या)
▪️ कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव
▪️ लसीकरण दरमहा वाढीव ३ कोटी डोसेस केंद्राकडून घेण्याबाबत ठराव
▪️ ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सर्वाधिक निधी मंजूर
▪️ राज्याच्या नवीन कृषी विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी
▪️ विदर्भातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव संमत
▪️ केंद्रानं राज्याला महिन्याला लसींचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून देण्याचा ठराव.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Mahalive News
Comments