top of page
Search
Writer's pictureMahaLive News

Weather Update: मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट; मेघगर्जनेसह पावसाची शक्यता...

चक्रीय वार्‍याची स्थिती सक्रिय झाल्याने देशातील काही राज्यांसह महाराष्ट्रात देखील अवकाळीचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, आज दि. ७ पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेडला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हयात ढगाळ वातावरण असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

त्यांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे शहरात व जिल्ह्यांत 7, 8, 9 तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे. यात प्रामुख्याने 7 तारखेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Mahalive Special Report
Play Video
bottom of page