top of page

अकरावीच्या सीईटीचा नवा पेच; नोंदणी संपल्यानंतर सीबीएसईचा निकाल, मुदतवाढ देण्याची मागणी...


औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर केला. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतित्रापत्रानुसार राज्यात अकरावीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी मंडळाच्यावतीनं पोर्टल तयार करण्यात आलं होतं. सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीनं सीईटी परीक्षेसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. अकरावी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 2 ऑगस्टला संपली आणि सीबीएसईचा दहावीचा निकाल 3 ऑगस्टला जाहीर झाल्यानं सीबीएसई शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल उशिराने लागल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी CET ला मुकण्याची भीती निर्माण झाली आहे. CET अर्ज नोंदणीची तारीख 2 ऑगस्ट आणि दहावीचा निकाल जाहीर झाला 3 ऑगस्टला लागल्यानं अकरावी सीईटी परीक्षेचा अर्ज दाखल करता येणार नाही. निकालाच्या संभ्रमात बऱ्याच विद्यार्थ्यांची राहिली अर्ज नोंदणी प्रक्रिया राहिली आहे. सीईटीला अर्ज करण्याची मुदत संपल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी मुदत वाढवून द्यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे. मूल्यांकनाच्या आधारावरून निकाल लावण्यास झालेल्या उशिरामुळे विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत. सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी होणार आहे..नोंदणीची मुदत समाप्त झाल्यानं सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश कसे मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई हायकोर्टात राज्यात अकरावी प्रवेश बाबत सीईटी प्रवेश परीक्षा घेण्या संदर्भातील याचिकेवरील पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. मुंबई हायकोर्टात राज्य सरकार तर्फे आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. राज्य सरकारनं अकरावी प्रवेशाबाबत 28 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीनं ही याचिका आपले वडील अॅड. योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज औरंगाबाद

Mahalive News


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

3rd Latur International Film Festival 2025
Play Video
bottom of page