नाशिक बस अपघात झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक- खासगी बसला भीषण आग लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. या घटनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांसह आयुक्तांशी माझे बोलणे झाले आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत जखमींवर चांगले उपचार झाले पाहिजेत. उपचरात काही कमी पडू नयेत अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे. दरम्यान, या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नाशिक बस दुर्घटनेबाबत सर्व बाबी तपासण्यात येतील तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. परंतू आता जे जखमी आहेत, त्यांना उपचार देण्याला आता प्राधण्य द्यावं, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Комментарии