मंत्रिमंडळाची बैठक सुरू; खातेवाटपाबाबत चर्चा, पहा मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय...
- MahaLive News
- Jul 4, 2023
- 2 min read

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करुन सरकारमध्ये सहभाग घेतला आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे शरद पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अजित पवार आपल्या साथीदारांसोबत मंत्रिमंडळात सहभागी झाल्यानंतर आज मंत्रिमंडळांची पहिलीच बैठक सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सुरु झाली आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतरची मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सोबत दिसले. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. तसेच खातेवाटपाबाबतही चर्चा करुन त्याला अंतिम रुप दिले जाणार आहे. पवार यांना महसूल किंवा वित्त मंत्रालय मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आज त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली आहे. या बैठकीत खातेवाटपावर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. रविवारी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र, अजून खातेवाटप झाले नाही. त्याबाबतच चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी पक्षातील बंडखोर नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाची बैठकीला उपस्थिती लावली आहे. पहिल्याच बैठकीत दोन उपमु्ख्यमंत्री शेजारी शेजीर बसल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेत्यांवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी हल्लाबोल केला होता. मात्र, आज पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नेत्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसण्याची वेळ या मंत्र्यांवर आली आहे. तोच प्रकार राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बाबतीत झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्र्यांवर विविध आरोप केले होते. मात्र आज त्यांच्यासोबत बैठकीला हे नेते एकत्र बसले आहेत.
मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय-
नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेणार
सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.
मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता 25 वर्षे.
राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन
मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी ‘सयाजीराव गायकवाड - सारथी शिष्यवृत्ती’ योजना. 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती
दिंडोरी, त्र्यंबक तालुक्यातील प्रवाही वळण योजनांना मान्यता
नागपूर कृषि महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र.
Comments