"चला बाहेर व्हा.. " मुंबईत एमईटीवर अजित पवारांची बैठक सुरू; छगन भुजबळ भडकले...
- MahaLive News
- Jul 5, 2023
- 1 min read

महालाईव्ह न्यूज | मुंबई- अजीत पवार यांच्या एमईटी येथील मेळाव्याला २९ आमदार पोहचले असून कार्यक्रमाला सुरूवात झाली आहे. यावेळी व्यसपीठावर शपथ घेतलेले नेते देखील उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. यादरम्यान छगन भुजबळ व्यासपीठावर गर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. पण सगळी भाषणं होतील तसं सगळा उलगडा होईल. ४० पेक्षा जास्त आमदार आहेत, काही ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत, काही बाहेर आहेत. सगळ्या आमदारांच्या प्रतिज्ञापत्र यावर सह्या आहेत. मात्र अद्याप धनंजय मुंडे आलेले नाहीत. ते ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी एमईटी येथे पोहचलेल्या अजित पवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. व्यासपीठावर अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांचं आगमन झालं आहे. आज अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इतिहासात पहिल्यांना एकाचं पक्षाच्या पदाधिकारी, आमदार खासदारांच्या दोन बैठकी होत आहेत.
Comments