top of page
Search
Writer's pictureMahaLive News

महामार्गालगत बाहू बली कुंपण उभारणार; अपघात रोखण्यासाठी नितीन गडकरींची घोषणा...


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. महामार्गांवर जणावरे येऊ नयेत म्हणून बाहु बली कुंपण उभारण्याची योजना तयार करत असल्याचे गडकरी म्हणाले. या कुंपणाची उंची १.२० मीटर असणार आहे, हे काम सुरु करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ३० च्या सेक्शन २३ वर बांधण्यास सुरुवात केली जाणार आहे. नितीन गडकरी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर वर ही माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वी हे कुंपण एक प्रदर्शन म्हणून काम करेल. हे कुंपण बांबूपासून बनविण्यात येणार आहे. यामुळे गुरे अपघातापासून वाचतील आणि पर्यावरणपुरक उपाययोजनाही तयार होणार आहे, असे गडकरींनी म्हटले आहे. बांबूवर क्रियोसोट तेलाने प्रक्रिया केली जाते. यानंतर त्यावर एचडीपीईने लेपन केले जाते. यामुळे ते एवढे मजबूत बनते की स्टीलला एक मजबूत पर्याय उपलब्ध होतो. महामार्ग सुरक्षित करताना वन्य प्राणी आणि पाळीव प्राण्यांचे जीव वाचविणे हा यामागे उद्देश असल्याचे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

क्रेडाई लातूर प्रॉपर्टी एक्सपो २०२४ भव्य शुभारंभास प्राजक्ता माळी...पहा LIVE🔴
Play Video
bottom of page