कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर टेम्पोचा अपघात...
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाघबीळ घाटातील नलवडे बंगल्याजवळील उतरणीच्या शेवटच्या वळणावरून टेम्पोचा अपघात झाला आहे. ओव्हरटेक करून समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना टेम्पो दरीत कोसळला आहे. या अपघातात गाडीतील चालक सतिश देवराज सिंग (वय-48, रा. उत्तरप्रदेश) यांना आणि जखमी योगेश राव यांना प्रवाश्यांनी गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी पाठविले. याबाबतची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
Comments