सीईटी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर; 18 मार्च ते 23 जुलै दरम्यान परीक्षा, पाहा शेड्युल...
- MahaLive News
- Jan 9, 2023
- 1 min read

मुंबई- उच्च व तंत्र शिक्षण विभागाबरोबरच कला, कृषी, वैद्यकीय शिक्षण, आयुष शिक्षण या विभागाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येणाऱ्या 'सीईटी' परीक्षांचं तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेळापत्रकानुसार, यंदा 18 मार्च ते 23 जुलै या कालावधीत 'सीईटी' परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर अभियांत्रिकीसाठी एमएच-सीईटी परीक्षा 9 ते 20 मे दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे.
हे सीईटी परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक आहे. अभियांत्रिकी, कृषी, बी. फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमधील परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान, तर पीसीबी ग्रुपसाठी 15 ते 20 मे दरम्यान होणार आहे. तर विधी अभ्यासक्रमात एलएलबीसाठी 1 एप्रिलला, तर एलएलबी यासाठी 2 आणि 3 मे रोजी परीक्षा होणार आहे.
सीईटी परीक्षेचा तात्पुरता कालावधी
- एमबीए/एमएमएस - १८ आणि १९ मार्च
- एमसीए - २५ आणि २६ मार्च
- एलएलबी (५ वर्ष) - १ एप्रिल
- बी.ए/बी.एस्सी बी.एड - २ एप्रिल
- एलएलबी (३ वर्ष) - २ आणि ३ मे
- बी.एचएमसीटी - २० एप्रिल
- बी. प्लॅनिंग - २३ एप्रिल
- बॅचलर ऑफ फाइन आर्ट (ऑफलाइन) - १६ एप्रिल
- बी. डिझाईन - ३० एप्रिल
- बी.ई/बी.टेक आणि बी.फार्म - ९ ते २० मे
दरम्यान, जेईई, नीट, सीयुईटी, यूजीसी नेट या परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झालं आहे. या परीक्षांसह महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन सीईटी सेलनं परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
माहितीसाठी संकेतस्थळ
अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक याबाबत सीईटीच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Comments